नारायण राणेंसारखा रोजगाराचा विचार श्रद्धाराजे करतायत

रवींद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2025 13:12 PM
views 31  views

सावंतवाडी : सावंतवाडीत आरोग्य सेवा, कामासाठी ग्रामीण भागातील लोक शहरात येतात. नागरिक सुविधांचा बोजा शहरावर पडतो. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा उद्दात हेतू लक्षात घ्यावा‌. त्यांच्या अभ्यासाचा फायदा सावंतवाडीतील प्रत्येक महिला, युवकांना देण्यासाठी त्यांचा विचार आहे. हजारोंना रोजगार देण्याचा विचार त्यांचा आहे. आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना आधार देण्याचा त्यांचा विचार आहे असे मत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. 


लहानपणापासून सावंतवाडी शहर बघत आलोय. मोती तलावाच आकर्षण आजही आहे.    शहराला सौंदर्य आहे. शुभकार्याला श्री देव पाटेकराची आठवण आम्ही करतो. देव पाटेकर सावंत-भोसलेंसह आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील राजघराण्याच योगदान आहे. माणसाला मागे कुणी काय केलं ? हे विसरायची सवय असते. लोडशेडींग मुक्त सिंधुदुर्ग करण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केल. शहराला सुविधा देण्याची व्यवस्था राजघराण्यानं केली. घरात येणार पाणी राजघराण्याच्या पुण्याईने येत याची जाण ठेवावी. दुरदृष्टीन केलेला विचार यातून दिसतो. लोकसंख्या वाढली असल्याने ड्रेनेज सिस्टीम मध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच सरकार आहे. पार्लमेंट तू पंचायत एक विचारांच सरकार असणं आवश्यक आहे. त्यामुळे विकासाची गंगा शहरात आणण सोपं होईल असं मत व्यक्त केले. 


वेंगुर्ला नगरपरिषद भाजपच्या हाती होती. तिथे झालेला कायापालट आज दिसत आहे. २३ प्रकल्प तिथे उभे राहिले आहेत. एक विचारांच सरकार असल्याने मोठ्या प्रमाणात निधी तिथे देण्यात आला. गतिमान विकास करता आल, पारितोषिक मिळवता आली. त्यामुळे सावंतवाडी करांनी देखील भवितव्याचा विचार करावा. शाश्वत विकासासाठी निधी अभावी राहिलेली भुमिगत विद्युत वाहिनी, ड्रेनेज सिस्टीम पुर्णत्वास आणण्यासाठी भाजपचा उमेदवार निवडून देण आवश्यक आहे. तिनं मत कमळा समोरील बटन दाबून भाजपला मतदान करावं. ते मतदान विकासाला, पुढच्या पिढीला असेल. युवराज्ञी व नगरसेवकांना त्यासाठी मतदान करण आवश्यक आहे. धुळ्यात राजघराण्याला बिनविरोध निवडून दिलं. त्यामुळे शहरवासियांनीही याचा विचार करावा. सिंधुदुर्गातील प्रत्येक नगरपरिषद भाजपच्या ताब्यात द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला दत्तक घेतील असं मत व्यक्त केले. जीडीपी वाढविण्यासाठीचा नारायण राणेंचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी युवराज्ञींचा पुढाकार आहे. त्यामुळे या शहराला विकसित करण्यासाठी भाजपला मतदान करा. पालकमंत्री असताना आरोग्य केंद्रात टेलीमेडीसीन मी सुरू केलं. मुंबईतील डॉक्टर तिथे सल्ला देत आहेत. आरोग्य सेवेसाठी भाजप तत्पर आहे. देवेंद्र फडणवीस युवराज्ञींच्या पाठीशी आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌