LIVE UPDATES

एका रूमची मागणी करून ३ रूमचा वापर

डिसोजांच्या आरोपांवर नगराध्यक्षांचे प्रत्युत्तर
Edited by: विनायक गांवस
Published on: June 12, 2026 22:29 PM
views 202  views

सावंतवाडी : मायकल डिसोजा यांच्याकडून एका जागेची मागणी करून दोन जागा वापरल्या जात होत्या. १५ दिवसांसाठी मागणी केली होती, पैसे भरले होते. आता दीड महिना झाला आहे. ही इमारत सांस्कृतिक, ऐतिहासिक संग्रहालयासाठी आरक्षीत आहे. एक जागा सांगून दोन जागेत सेटअप उभारल्याचे प्रत्युत्तर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिले. मायकल डिसोजा यांच्या आरोपानंतर त्यांनी आपली बाजू मांडली आहे. 

त्या म्हणाल्या, एक लाख ५० हजार भाड असं काहीही नसून ५० हजार भाड त्यांनी भरले आहे. एका जागेची मागणी करून दुसऱ्या जागेसह जेवण्यासाठी तिसरी जागा वापरली जात होती. आज मी पाहणी केली त्यावेळी या गोष्टी समोर आल्या. मुंबई विद्यापीठाची जागेबाबत त्यांनी मला प्रश्न केला. मात्र, मी नगराध्यक्ष असण्यापूर्वी ही जागा दिलेली होती. आता आमच्या काळात त्यांनी एक रूम मागून तिन रूम वापरले आहेत. १५ दिवसांचे पैसे भरून एका महिन्याचे पैसे भरलेले नाहीत. ही गोष्ट चुकीची असून त्यांना विचारलं असता राग आला आहे. अतिरिक्त रूम त्यांना हवे होते तर परवानगी घेण आवश्यक होतं. मात्र, परवानगी न घेता इतर रूम वापरले जात असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ भोसले यांनी दिली. तर बाथरूम वापरण्याचा कोणताही विषय मी म्हटलेला नाही‌. तसेच इतर आरोपांबाबत आम्ही बोलू असंही त्यांनी स्पष्ट केलं.