LIVE UPDATES

गुरांची वाहतूक करताना आढळल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 12, 2026 20:29 PM
views 43  views

कणकवली : बोलेरो पीकअपमधून विनापरवाना गुरांची वाहतूक करताना आढळल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवार ११ जून रोजी रात्रौ ९.३० वा. च्या सुमारास कनेडी - फोंडाघाट मार्गावर घडला. पोलीस हवालदार स्वप्नील जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ रोजी रात्रौ बोलेरो जीपमध्ये दोन गाय आणि दोन बैल पाडे दाटीवाटीने भरून कोल्हापूरच्या दिशेने नेण्यात येत होते. वाहतूक करणाऱ्या हातकणंगले येथील माणीक बाबासाो पाटील (४७), अमर बाळासाो पाटील (४३) आणि इजाज शब्बीर जामदार (३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना नोटीस देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार सुभाष शिवगण करीत आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गुरांची वाहतूक करणारी सदरची जीप अडवून फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला. यावेळी सदरची गुरे हरकुळ बु. येथील असल्याचे समजते. गुरे वाहतूक करणाऱ्यांना प्रसाद देण्यात आला तसेच त्यांच्या वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याचे समजते. शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गर्दी झाली होती