श्रद्धा पाटील यांचं निधन !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 09, 2023 19:03 PM
views 64  views

वैभववाडी : सांगुळवाडी येथील श्रद्धा संदीप पाटील (वय ५२) यांचं अल्पशा आजाराने आज (दि९) सकाळी कोल्हापूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. सौ.पाटील यांना फुफ्फुसाचा आजार असल्याने गेले दोन महिने कोल्हापूर येथे  उपचार सुरू होते. सांगुळवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. अनगरसिद्ध शिक्षण संस्थेचे संचालक संदीप पाटील यांच्या त्या पत्नी होत.