
कुडाळ : गंभीर आजार आणि त्यावरील ऑपरेशन्स यासाठी गोवा किंवा कोल्हापूरवर अवलंबुन असणारा सिंधुदुर्ग जिल्हा. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लाईफ टाईम हॉस्पीटलनं किमया साधली आणि सिंधुदुर्गातली पहिली बायपास यशस्वीरीत्या पार पडली.
गेल्या काही वर्षात राज्याचं आरोग्य खातं कोकणाकडं आलं असलं तरी काही दिवसांपर्यत गंभीर आजारांसाठी कोकणवासीयांना गोवा किंवा कोल्हापूरला जावं लागत होतं. आता मात्र हे चित्र बदलण्यात कोकणचं ज्येष्ठ नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यश आलंय. त्यांनी स्थापन केलेल्या लाईफटाईम हॉस्पीटलमध्ये पहिलीच बायपास शस्त्रक्रीया यशस्वीरीत्या पार पडली. मालवण तालुक्यातील अमित परब यांच्यावर ही पहिलीच शस्त्रक्रीया करण्यात आली. कोल्हापूरचे तज्ञ डॉक्टर अमृत नेर्लीकर यांनी यासाठी आपलं कसब पणाला लावलं आणि सिंधुदुर्गातली ही पहिलीच शस्त्रक्रिया लाईफ टाईम हॉस्पीटलमध्ये पार पडली. आज रूग्ण अमित परब यांना हॉस्पीटलमधुन डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी स्वत पेशंट, नातेवाईक आणि हॉस्पीटलच्या स्टाफनं कोकणसाद लाईव्हशी संवाद साधला.