वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का....!

तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या गावातच लावला सुरुंग
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2024 23:36 PM
views 215  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात उबाठा सेनेला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  खांबाळे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात जंगी स्वागत केले आहे. उबाठा गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या गावातच नितेश राणे यांनी उबाठा सेनेला सुरुंग लावला आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये गंगाराम रामचंद्र अडुळकर, संजय चंद्रकांत गुरखे, बाबाजी भागोजी देसाई, रोहित बाबाजी अडुळकर, रमेश धोंडू बरगे,  दाजी विठ्ठल बरगे, अनंत लक्ष्मण देसाई, गंगाराम रामचंद्र देसाई, प्रकाश विठोबा अडुळकर, शिवाजी बाबू बरगे, संतोष कोंडीबा शेळके, रामचंद्र कोंडीबा शेळके, संजय बिरु बरगे,  बाळकृष्ण बिरु बरगे, गणपत रामचंद्र अडुळकर, विठोबा रामचंद्र अडुळकर, वनिता रमेश बरगे, संजना संजय बरगे, सविता संतोष बरगे, सुवर्णा बाळकृष्ण बरगे, सुनिता लक्ष्मण देसाई, सीताबाई रामचंद्र देसाई, सुनिता संतोष शेळके, रंजना शेळके, प्रेमा रामचंद्र शेळके, विजया चंद्रकांत गुरखे, चंद्रकांत भागोजी गुरखे, नारायण रामचंद्र बोडेकर, प्रकाश रामचंद्र बोडेकर, ज्योतिबा न्हाऊ बोडेकर, महेंद्र न्हाऊ बोडेकर, रुपेश तुकाराम बोडेकर व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे,संजय सावंत, नवलराज काळे, उमेश पवार, आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.