
सावंतवाडी : माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून उबाठा शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सुरज परब, विभाग प्रमुख संजीव पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठाच्या सांगेलीच्या माजी सरपंच रमाकांत रावजी राऊळ, माजी सरपंच सुवर्णा सुरेश राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक मोहन सांगेलकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश न्हानु राऊळ, वासू होडावडेकर, युवा कार्यकर्ते विकास राऊळ, रोशन राऊळ, सुरेश राऊळ, भाग्यश्री राऊळ, बाबुराव राऊळ, संजय देसाई, संजय राऊळ, राजन सांगेलकर, सुभाष राऊळ यांच्यासह अनेक सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश होता. या पक्षप्रवेशाने माडखोल परिसरातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्वागत केले.