सावंतवाडी उबाठा उपतालुकाप्रमुखपदी सोनू दळवी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 29, 2024 07:45 AM
views 180  views

सावंतवाडी : शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा संपर्क मोठा आहे. गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनू दळवी यांचे सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. 

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा, जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा सावंतवाडी तालुका संघटना मजबूत करण्यासाठी नवनिर्वाचित सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली संपर्क यात्रा सुरु आहे. त्या

पार्श्वभूमीवर विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांच्याकडे सावंतवाडी उपतालुका पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोजा, महिला संघटिका सुकन्या नरसुले, भारती कासार, नम्रता झारापकर, शब्बीर मणियार, शिवदूत अशोक परब, माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे, अशोक धुरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.