मुंबईस्थित कुडाळ - मालवणकरांची २१ फेब्रुवारीला शिवसेना भवनात बैठक !

वैभव नाईक यांचं उपस्थित राहण्याचं आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 15, 2024 14:48 PM
views 171  views

सिंधुदुर्ग :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६  वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील, कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत,महिला विधानसभा संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू  हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी मुंबई ठाणे,कल्याण, विरार, वसई व इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वीय सहाय्यक अनंत पाटकर मोबा- ९०११९९५५०३  यांच्याशी संपर्क साधावा.