
कुडाळ : कट्टर नारायण राणे समर्थक समजले जाणारे नागेश नेमळेकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी श्री. नेमळेकर यांना कुडाळ शहर प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत पाहून आपण प्रेरित होऊन हा पक्ष प्रवेश केला आहे. पक्षाने दिलेली जबाब जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पाडू असे नागेश नेमळेकर यांनी सांगितले.