
वेंगुर्ला : तुळस पंचायत समिती युवासेना उपविभाग प्रमुख पदी सखाराम परब यांची नियुक्ती करण्यात आली. तर अवधूत परब यांची बुथप्रमुख पदी व वायंगणी बूथप्रमुख पदी सचिन म्हारव यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना शहर प्रमुख सागर गावडे, युवासेना तालुका संघटक विशाल राऊत, युवासेना शहर सचिव उमेश आरोलकर, तुळस विभाग प्रमुख संजय परब, प्रतीक खानोलकर, स्वप्नील होसमनी, प्रज्वल पालव आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.