
सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व केसरकर समर्थकांनी संजू परब यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संजू परब व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आगामी निवडणुकी संदर्भात चर्चाही झाली. श्री. परब यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, मंदार नार्वेकर, प्रेमानंद देसाई, सूरज परब, अँड. निता कविटकर, विनोद सावंत, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे आदि उपस्थित होते.