मणेरी उपसरपंचपदी निवड ; विशाल परब यांचे शिवसेनेनं केलं अभिनंदन

Edited by: संदीप देसाई
Published on: April 24, 2024 12:28 PM
views 206  views

दोडामार्ग : मणेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल मोहन परब यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल येथील शिवसेना कार्यालयात दोडामार्ग तालुका शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. 

 मणेरी उपसरपंचपदी यापूर्वी कार्यरत असलेल्या राया भिरु काळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त पदासाठी झालेल्या निवणुकीत विशाल परब यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली.  त्यानिमित्त येथील शिवसेना कार्यालयात त्यांच्या गळ्यात पुष्पहार व पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपतालुका प्रमुख दादा देसाई, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, युवासेना शहरप्रमुख गुरुदास बोंद्रे, कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत, सुमित गवस, आदी उपस्थित होते.