
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ओरोस जिल्हा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवपुतळ्याला व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.
तसेच कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि कणकवली शहर शिवसेनेच्या पुढाकाराने कणकवली शिवसेना शाखेसमोर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांवर आधारित लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर पटवर्धन चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी ओरोस येथे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, जयभारत पालव, अवधूत मालणकर, बाळू पालव, नागेश ओरोसकर, बाळा कांदळकर, डॉ. सूर्यकांत बालम, गणेश मेस्त्री, रवींद्र परब, निलेश परब,निलेश ओरोसकर, भगवान परब, मामा ओरोसकर, मुकेश परब, कुलवंत वारंग, हरी वायंगणकर, वसंत बांबूळकर, सुनीता बोंद्रे, योगेश ओरोसकर,तेजस वेंगुर्लेकर, सुरेश सावंत, मारुती मुंज, प्रकाश आंगणे, शाहू फर्नांडिस, संजय सावंत, सतीश परब, बाळा बेळगावकर, रोहन सावंत, संतोष मेस्त्री आदी उपस्थित होते.
कणकवली येथे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत,रुपेश नार्वेकर, राजू शेटये, राजू राठोड,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महेश कोदे, तेजस राणे, अजित काणेकर,आबू मेस्त्री, योगेश मुंज, जयेश धुमाळे, तात्या निकम, वैद्येही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते, साक्षी आमडोस्कर, धनस्त्री मेस्त्री, रोहिणी पिळणकर, मीनल म्हसकर, प्रतीक्षा साटम, अर्पिता परब, भालचंद्र दळवी, मुकेश सावंत, सी. आर. चव्हाण, गोट्या कोळसुलकर, समीर परब, संदीप घाडीगावकर, मिलिंद आईर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.