
देवगड : १७ मार्च २५ रोजी दाभोळे, येथे शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आला. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या सोहळ्यात सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आनंदाने व हिरीरीने भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी संतोष मयेकर, बाबू घाडी, अतुल घाडी, विकास घाडी, रुपेश अनुभवणे, कृष्णा घाडी, अक्षय धुरी, पार्थ थोटम, साहील मयेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.