
देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे येथे शिव प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या उत्सवात ढोल वादन, क्रिकेट सामने, लहान मुलांची विविध स्पर्धा, स्थानिक भजने तसेच रेकॉर्ड डांस आयोजित करण्यात आले होते.
तसेच दुपारच्या वेळात शिवप्रेमींसाठी स्नेह भोजनाचे नियोजन शिव प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते. या सोहळ्यात सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आनंदाने व हिरीरीने भाग घेतला होता