
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा सादर करण्यात आला. यासाठी मुले मुली मराठमोळ्या पोशाखामध्ये आले होते. तसेच शिशुगटातील मुला-मुलींनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
शिवजयंती निमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाने अतिशय सुंदर अशी भाषणे केली. या कार्यक्रमासाठी शकील मोडक, सुहास भंडारी, अनिल रेडेकर, सतीश वारे, प्रणित राजेशिर्के, रसिका सुर्वे, सेजल साळवी, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, सोनाली राठोड, मनीषा शिंदे ,स्मिता सावंत, पूनम चांदेकर, रूपाली कुंभार, सायली शिर्के ,योगिता गावडे, गायत्री वनकुते, गायत्री साठे, श्रुती कांबळे, पूनम भुवड, स्नेहल नवरंग, संजना चव्हाण, शुभांगी पवार, आदिती बागवे आदी उपस्थित होते.