
सावंतवाडी : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात पार पडली. यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याला जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, जिल्हा संघटक प्रेमानंद देसाई, महिला तालुका संघटक भारती मोरे, माजी नगराध्यक्ष आनारोजीन लोबो, तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, आबा केसरकर, ललिता सिंग, सपना नाटेकर, माजी नगरसेविका दिपाली सावंत, गीता सुकी, प्रतीक्षा मिसाळ, ज्योत्सना सुतार, भारती परब, पूजा नाईक, सुप्रीता धारणकर, शुभांगी तूयेकर, सुवर्णा गाड, गजानन नाटेकर, सुभाष गावडे, शैलेश मेस्त्री, संजू गावडे, लक्ष्मण भालेकर, महादेव राऊळ, वैशाली कानसे, शिल्पा मेस्त्री आदी उपस्थित होते. श्रीधर अपारमेंट संपर्क कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य तैलचित्र उभारण्यात आले होते. दीप प्रजनन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली.