
सावंतवाडी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवराज लखमराजे भोंसले यांनी या बालचमुंच कौतुक केले
राजे प्रतिष्ठान कामगार संघटनेतर्फे दर वर्षीप्रमाणे या वर्षी मोठया उत्साहाने शिव जयंती साजरी करण्यात आली. शाळा क्रमांक 4, अंगणवाडीच्या मुलांनी वेशभूषा व पोवाडा सादर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर,सचिव रामचंद्र कुडाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे,सचिव कल्याण कदम, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, नारायण राणे, राजेंद्र राणे,विशाल राव राणे, जिल्हा महिला अध्यक्ष महिला पूजा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष पूजा सोनसूरकर, तालुका अध्यक्ष संचिता गावडे, अंकिता माळकर, राजेश नाईक, अक्षता कुडतरकर, दर्शना राणे, प्रणिता सावंत, रुपाली रेडकर, आनंद नाईक, प्रिया मेस्त्री, अंकिता सावंत, यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.