
सावंतवाडी : मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. त्यानंतर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी हायवे ब्रीज ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ढोलपथक, लेझीम नृत्यासह भव्य रॅल काढण्यात आली.
यावेळी "जय भवानी, जय शिवाजी" , "छत्रपती शिवाजी महाराज की जय" च्या घोषणांनी मळगावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. राञी वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा, लाठीकाठी आदी कार्यक्रम पार पडले. मर्दानी खेळ झाल्यानंतर स्पर्धेचा बक्षीस समारंभान शिवजयंतीची उत्साहात सांगता झाली.