क्रीडा तपस्वी कै.शिवाजीराव भिसे यांना अभिवादन !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 22, 2024 12:38 PM
views 120  views

सावंतवाडी : क्रीडा तपस्वी कै.शिवाजीराव भिसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे भिसे सरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उभा बाजार हनुमान मित्र मंडळ अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर, ॲड. संजू शिरोडकर, सरांचे सुपुत्र अनिल भिसे, अरुण भिसे, बंड्या कोरगावकर, प्रशांत वाळके माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष  दत्तप्रसाद गोटसकर, प्रमोद मडगावकर, शालू फर्नांडिस, प्रशालेचे प्राचार्य मानकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ॲड. संजू शिरोडकर यांनी सरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सरांनी विविध खेळांमध्ये कसे खेळाडू घडविले तसेच सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील सरांचे अतुलनीय काम कसे होते याबाबत विस्तृत विवेचन केले. प्राचार्य श्री.मानकर  यांनीही सरांचे शाळेबाबतचे योगदान सरांनी नवीन शिक्षकांना केलेले मार्गदर्शन तसेच त्यांचे विद्यार्थी घडवण्याचे कौशल्य याबाबत माहिती दिली. अरुण भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मल्लखांब खेळ कसा रुजवला आणि मल्लखांब चे खेळाडू कसे तयार केले याबाबत माहिती दिली. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. पावसकर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

यावेळी सरांचे विद्यार्थी दिलीप वाडकर यांनी ठेवलेल्या ठेवीमधून सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्यात आले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.