कणकवली : विधानपरिषद राष्ट्रवादीचे नवनियुक्त आमदार शिवाजीराव गरजे यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने प्रदेश चिटणीस एम. के. गावडे व जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात नुकत्याच भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांसह सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, प्रांतिक सदस्य विलास गावकर यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित. यावेळी अबिद नाईक व सहकारी पदाधिकारी यांनी आमदार गरजे यांचेशी जिल्ह्यातील विविध विकास प्रशनी चर्चा केली. त्यांनतर गरजे यांनीही सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीला सर्वतोपरी सहकार्याचे करण्याचे आश्वासन दिलं असल्याची माहिती अबिद नाईक यांनी दिली आहे .