
कुडाळ : माजी खासदार निलेश जी राणे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भाजपा सिंधुदुर्ग आयोजित भव्य दिव्य कोकण पर्यटन महोत्सव 2023 आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य साजरा करताना शिवगर्जना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य आयोजित करण्यात आले आहे.
प्रयोग सदर नाट्यप्रयोग 17 मार्चला सायंकाळी 5:00 वाजता कुडाळ येथील नवीन बस स्टँडच्या मैदानात होणार आहे. त्या महानाट्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून होणार आहे, असे पत्रकार परिषदेत भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते संजू परब आणि युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी सांगितले. यावेळी दादा साईल, अशोक सावंत, विशाल कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी संजू परब म्हणाले दिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नारायण राणे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार उदयनराजे भोसले, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत , पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, सत्कार मूर्ती माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, गोव्याचे आमदार जीत आरोलकर, किरण उर्फ भैय्या सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा संपूर्ण कार्यक्रम विशाल सेवा फाऊंडेशन सिंधुदुर्ग व भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने होत आहे. विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तसेच भाजपा युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब हे दरवर्षी माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस अतिशय भव्य दिव्य साजरा करतात. यावर्षी त्यापेक्षाही मोठा करण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.