
सावंतवाडी : आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे. घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करत मतदारांशी थेट संवाद साधत या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी श्री. कवठणकर यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रचार दौऱ्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रचारादरम्यान महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










