
सावंतवाडी : शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांनी बाजारपेठेसह प्रभाग क्रमांक ६ मध्ये झंझावाती प्रचार केला. यावेळी उमेदवार देव्या सूर्याजी व शर्वरी धारगळकर उपस्थित होते.
यावेळी ॲड. निता सावंत-कविटकर यांनी आपल्यासह देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. श्री. सुर्याजी यांनी रक्तासह आरोग्यसेवा करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं आवाहन केलं. यावेळी सत्यवान बांदेकर, समता सुर्याजी, ममता बांदेकर, संकल्प धारगळकर, सिद्धेश धारगळकर, मंथन जाधव आदी उपस्थित होते.












