
वैभववाडी : तालुक्यातील लोरे नं २ गावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे रुपेश पाचकुडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
लोरे गावच्या विद्यमान उपसरपंच शुभांगी कुडतरकर यांनी व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेवर निवडणुक लागली होती. याकरिता आज सरपंच विलास नावळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेला ग्रा प सदस्य विनोद पेडणेकर, रितेश सुतार, सुप्रिया रावराणे, शुभांगी कुडतरकर, विशाखा मांडवकर, निकिता आग्रे, रुपेश पाचकुडे इ सदस्य हजर होते. यावेळी सरपंच विलास नावळे यांनी रुपेश पाचकुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर केली.
या ग्रामपंचायत मध्ये ९ सदस्य असून त्यापैकी सात सदस्य शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पाचकुडे यांची निवड बिनविरोध झाली.निवड जाहीर झाल्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके व शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाना रावराणे, सरपंच विलास नावळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्य रुपेश पाचकुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य दिव्या पाचकुडे, युवासेना तालुका समन्वयक दत्तात्रय परब, सुरेंद्र रावराणे, मीथील नाचणेकर, सुभाष कुडतरकर, अनिल नराम, देऊ मांजलकर , दिलीप मांजळकर, सुरेश नाचनेकर, माजी सरपंच महेंद्र रावराणे ई कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच विलास नावळे यांनी उपस्थित सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार मानले.