
कणकवली : शनिवारी दिनांक ११ मार्च रोजी दुपारी 03 वाजता रत्नागिरी- सिंधुदुर्ग शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचा कणकवली मातोश्री हॉल येथे भव्य स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.या निमित्ताने कार्यकर्ता व शिवसैनिकांचा मेळावा,सरपंच,उपसरपंच सदस्य यांचा सत्कार व पक्षप्रवेश होणार आहे. तरी शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी केले आहे.