
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक ६ मधून शिवसेना उमेदवार युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सौ. शर्वरी धारगळकर यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. दैवज्ञ मंदीर येथे श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी प्रचारास सुरुवात केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिवसेनेचे उमेदवार देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर यांनी गणरायाचे आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आबा केसरकर, रमेश सुर्याजी, समता सुर्याजी, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, संकल्प धारगळकर, सिद्धेश धारगळकर, श्रद्धा सावंत, गणेश कुडव, श्री. शिरवलकर, श्री. फर्नांडिस आदी उपस्थित होते.










