युतीतील शिवसेना - भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावं

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 21, 2026 19:12 PM
views 28  views

देवगड :  देवगड तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तसेच युतीतील शिवसेनेने आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून शिरगांव (अनुसूचित जाती – सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. देवदत्त दामोदर कदम, किंजवडे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. सावी गंगाराम लोके, कुणकेश्वर (ना.मा.प्र.) मतदारसंघातून श्री. सुनिल बाळकृष्ण पारकर, पुरळ (सर्वसाधारण) मतदारसंघातून . संजय नामदेव बोंबडी, पडेल (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून कु. सुयोगी रविंद्र घाडी, बापर्डे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून अवनी अमोल तेली तसेच पोंभुर्ले (ना.मा.प्र. – महिला) मतदारसंघातून अनुराधा महेश नारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून पुरळ (ना.म.प्र. – महिला) मतदारसंघातून सौ. संजना सत्यवान आळवे, तिर्लोट (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. रविंद्र तिर्लोटकर, पडेल (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. अंकुश यशवंत ठूकरुल तसेच नाडण (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. गणेश सदाशिव राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय शिरगांव (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. शितल सुरेश तावडे, किंजवडे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे, कोटकामते (ना.म.प्र. – महिला) मतदारसंघातून सौ. ऋतूजा राकेश खाजणवाडकर तसेच मुणगे (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, युतीअंतर्गत शिवसेनेच्या वाट्याला देवगड तालुक्यातील तीन पंचायत समिती मतदारसंघ देण्यात आले आहेत. त्यानुसार मणचे (सर्वसाधारण) मतदारसंघातून विलास साळसकर, कुणकेश्वर (सर्वसाधारण) मतदारसंघातून अमोल लोके तसेच तळवडे (अनुसूचित जाती – महिला) मतदारसंघातून सलोनी संतोष तळवडेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.