आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळला शिवजयंती साजरी

भव्य रॅलीसह पोवाड्याचे सादरीकरण
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 10, 2023 19:58 PM
views 114  views

कुडाळ : कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शहरात रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी हातात भगवे झेंडे, डोक्यात भगवे फेटे बांधून शिवरायांचा जयघोष करण्यात आला.

      शिवसेना शाखा, बसस्थानक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नगर अशी हि रॅली काढण्यात आली. या रॅलीत आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, नागेंद्र परब, जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, योगेश धुरी, सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, सौ. श्रेया गवंडे, सौ. सई काळप, सौ. श्रुती वर्दम, सौ. ज्योती जळवी, सौ. श्रेया परब, रूपेश पावसकर, राजू गवंडे, गुरू गडकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, गुरू सडवेलकर, मंजू फडके, अमित राणे, संदीप महाडेश्वर यांच्यासह शिवसैनिक तसेच शिवप्रेमींनी सहभाग घेतला. 

    यावेळी पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले. लहान मुलांनी शिवरायांची वेशभूषा साकारून रॅलीत सहभाग घेतला. लहान मुलांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.