शिवसेनेला कमी लेखू नये !

नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम !
Edited by: विनायक गावस
Published on: October 30, 2025 14:36 PM
views 392  views

▪️ त्यांच्यासारखं नेतृत्व निलेश राणे करतायत : उदय सामंत 

सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही. केसरकरांची शांतता वादळापूर्वीची आहे. नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे. त्यांच्यासारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. कुणाला कमी लेखण्याच काम होणार नाही. पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास तो द्यायचेही आवाहन केलं, त्याच स्वागतही करू. मात्र, शिवसेनेला कमी लेखू नये, असे आवाहन शिवसेना संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. 


सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दिनेश गावडे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, हर्षद डेरे, सुनिल डुबळे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, प्रेमानंद देसाई, परिक्षीत मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री. सामंत पुढे म्हणाले, केसरकर पायानं मारतात ती गाठ हातानं सुटत नाही. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. वाईट घडू नये म्हणून एकनाथ शिंदे देखील पुढाकार घेत आहे‌. मात्र, महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी आपली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम असलं पाहिजे. संजू परब यांसारखा सतर्क पदाधिकारी असल्यास संघटना निश्चित वाढणार आहे. दुसरीकडे निधीची मोठी ताकद दीपक केसरकर यांनी उभी केली आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याला साथ द्या असे आवाहन केले. तसेच नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा आम्ही बघितला. तीच माणसं आज निलेश राणेंच्यामागे उभी आहेत. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे. नारायण राणेंनी भगवा फडकवला तसाच पुन्हा भगवा फडकावयचा आहे ही राजन तेलींचीही भावना असल्याचे विधान केले. 


दरम्यान, समोरचे बरोबर घेणार नसतील तर करायचं काय ? हा देखील प्रश्न आहे. आम्ही संयमी आहोत. एक घाव, दोन तुकडे करणार नाही. संपर्कमंत्री म्हणुन बोलयच कोणाशी हा देखील प्रश्न पडतो. कारण, त्यापूर्वीच मैत्रीपूर्णची विधान होतात हे यानिमित्ताने सांगू इच्छितो. महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे. महायुती झाली तरी भगवा, स्वबळावरही भगवा हीच भुमिका आहे. हा मेळावा आदेशाचा आहे असं समजावं. महायुतीचा निर्णय नेते घेतील. मात्र, शिवसेनेचा उमेदवार असणार अशी भुमिका घेऊन कामाला लागा, प्रचारास सुरुवात करा असे आवाहन शिवसेना संपर्क मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल. तसेच जर गरज लागली तर मी देखील प्रचाराला येईल. आपण कुठेही कमी नाहीत. दोन आमदार आमचे आहेत.‌ स्वबळावरही भगवा फडकवू शकतो. निलेश राणेंचा झंझावात आम्ही अनुभवत आहोत. मी देखील सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे. नारायण राणेंसारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. कुणाला कमी लेखण्याच काम होणार नाही. पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास द्यायचेही आवाहन केलं, त्याच स्वागतही करू. मात्र, शिवसेनेला कमी लेखू नये. मित्रपक्षानं आमचा सन्मान केला पाहिजे ही भुमिका आहे. ''हम किसी से कम नही'' केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, आम्ही तुमच्या आशीर्वादान लढू, विरोधकांच डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्गात येणार आहेत अशी माहिती श्री सामंत यांनी दिली.