
कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि सहकारी यांनी 'त्या' मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आमदार निलेश राणे व शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांना आर्थिक मदत सुपूर्त केली.
दिनेश वारंग व सहकारी यांच्याकडून कुटूंबाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर, त्यांच्या घराला कोणाचाही आधार नसल्यामुळे दीक्षाच्या मोठ्या बहिणीला तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. तसेच दिनेश वारंग यांना त्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी व घावनळे उपसरपंच योगेश घाडीगावकर, घावनळे व बागवेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.










