दोडामार्गमध्ये शिवसेनेकडून रुग्णवाहिकेच लोकार्पण..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मंत्री दीपक केसरकर यांचे गणेशप्रसाद गवस यांनी मानले आभार
Edited by: संदीप देसाई
Published on: November 04, 2023 13:06 PM
views 402  views

दोडामार्ग : मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने दोडामार्ग तालुका शिवसेना पक्षासाठी उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेच लोकार्पण शनिवारी शिवसेना पदाधिकारी यांनी येथील पिंपळेश्वर चौकात केलं. ही रुग्णवाहिका शिवसेना जरी लोकार्पण करत असली तरी संपूर्ण तालुक्यातील रुग्णसेवेसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी दिली आहे.

आवश्यक असणारी रुग्णवाहिका दोडामार्ग साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले आहेत या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, राजेंद्र निंबाळकर, रामदास मेस्त्री, योगेश महाले, शैलेश दळवी, गोपाळ गवस, तीलकांचन गवस, संजय गवस, भगवान गवस, उदय मयेकर, मायकल लोबो, अनिल शेटकर, प्रवीण गवस, चेतना गडेकर, राधिका गडेकर, सानवी गवस, सविता नाईक, अश्विनी शिरोडकर, प्रांजल गवस व अन्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.