गाव्यारेड्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान, जंगलातील अनधिकृत वृक्षतोड, ऑनलाइन दाखल्याबाबत शिवसेनेने वेधले प्रशासनाचे लक्ष

Edited by: दिपेश परब
Published on: June 15, 2023 14:53 PM
views 82  views

वेंगुर्ला : तालुक्यातील गावरेड्यानी केलेल्या शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, जंगलात होत असलेल्या अनधिकृत वृक्षतोड व त्यावर वन विभागाचे दुर्लक्ष, ऑनलाईन विविध दाखले, पोलीस पाटील भरती आदी विविध विषयांसंदर्भात बुधवारी १४ जून  वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांचे भेट घेऊन लक्ष वेधले

यावेळी शिवसेना पदाधिकारी यांनी तुळस, होडावडे, मठ, आडेली, वजराठ, मातोंड, पेंडूर, दाभोली, वेतोरा आदी भागांमध्ये गवारेड्यांनी शेतीच्याच्या केलेल्या नुकसानाबद्दल त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळण्याबाबत मागणी केली. तसेच  तालुक्यातील अनधिकृत वृक्षतोड आणि त्याच्याकडे होत असलेले वनविभागाचे दुर्लक्ष याकडे सुद्धा तहसीलदार यांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना मिळत असलेले दाखले सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अपलोड होत नाहीत ते तात्काळ ऑफलाईन करून देण्यासाठीची सुद्धा मागणी केली. तसेच पोलीस पाटील भरती बाबत आश्वासित चर्चा करण्यात आली. 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे,  उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, तुळस विभाग प्रमुख संजय परब, मितेश परब, होडावडा ग्रामपंचायत सदस्य अरविंद नाईक, मठ माजी सरपंच धोंडी गावडे आदी उपस्थित होते.