LIVE UPDATES

शिवसेना चिपळूण शहरतर्फे भव्य गुणगौरव सोहळा !

उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती ; ५३८ विद्यार्थ्यांचा सत्कार
Edited by: मनोज पवार
Published on: June 18, 2025 15:24 PM
views 50  views

चिपळूण : शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शिवसेना चिपळूण शहरतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सोमवारी, १६ जून रोजी चिपळूण येथील अतिथी सभागृहात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या भव्य कार्यक्रमात एकूण ५३८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हाप्रमुख रश्मीताई गोखले, महिला शहरप्रमुख प्राजक्ता टकले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आयोजन शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रारंभी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये मिलिंद कडवेकर यांनी प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवडीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सांगितले, "शिवसेना ही केवळ राजकीय नव्हे, तर समाजासाठी झटणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे, ही आमची सामाजिक बांधिलकी आहे."

सदानंद चव्हाण यांनीही आपल्या भाषणात असे सांगितले की, "विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा आणि प्रेरणा देणारा उपक्रम आहे."

विशेष सत्कारामध्ये हरीज्ञा लक्ष्मण शिंदे हिला भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड, ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ कार्ले यांना नाट्य मंदार पुरस्कार यांचा समावेश होता.

ना. उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, "शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ आणि त्यांच्या टीमने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे तरुणांसाठी विशेष नोकरी केंद्र स्थापन करून रोजगाराच्या संधी वाढवल्या जातील." कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५३८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशामध्ये युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, शहरप्रमुख विनोद पिल्ले, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ परांजपे, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, पप्पू लाने, कपिल शिर्के, प्रमोद बुरटे, फैसल मेमन, अशोक चौधर, अमेय चितळे, संदेश गोरिवले, नयन चव्हाण, आदित्य पेडणेकर, ओंकार नलावडे, धीरज नलावडे, आदित्य जोशी, साई घडशी, अनिकेत शिंदे, महिला आघाडी आणि युवतीसेना पदाधिकारी:

सुकन्या चव्हाण, राणीताई महाडिक, नीताताई महाडिक,संगीता हुंबरे, सुवर्णा साडविलकर, रिया कांबळी, वंदना पाटील, तृप्तीताई कदम,पूर्वा तांदळे, दिशा किंजळकर, गायत्रीताई जोशी, रीना परमार, प्रियाताई शिंदे, अपर्णाताई पवार, शिवानी शिंदे, माजी नगरसेविका स्वातीताई दांडेकर, संजीवनी घेवडेकर आदी कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा राहिला.