शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी मालवणात जाहीर प्रचार सभा

Edited by:
Published on: November 08, 2024 18:19 PM
views 206  views

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी टोपीवाला हायस्कूल ग्राउंड, मालवण येथे सायंकाळी ठीक ४ वाजता होणार  आहे. तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.