
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिंदेच्या शिवसेनेकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येथील कार्यालयात तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचे नेतृत्वाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवप्रतिमा पूजन व शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजेंना नमन करणेत आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करणेत आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गवस, शैलेश दळवी, प्रेमानंद देसाई, अनिल शेटकर, रामदास मेस्त्री, बाबाजी देसाई, लवू मिरकर, संदीप गवस, दयानंद धाऊसकर, देसाई, भगवान गवस, लाडू आयनोडकर, प्रकाश गवस आदी उपस्थित होते.