शिवरायांचे तेजस्वी विचार भावी पिढीला देण्याचं शिवसंस्कार टीमच काम कौतुकास्पद : विशाल परब

Edited by:
Published on: October 14, 2024 05:45 AM
views 107  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा मातृभूमी शिक्षण संस्थेने सावंतवाडी मध्ये आयोजित केला, ही अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.

सावंतवाडी येथील बॅ.नाथ पै सभागृह येथे संपन्न झालेल्या मातृभूमी शिक्षण संस्था संचलित "शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा-२०२४" मध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात  विविध ऐतिहासिक स्पर्धा, आणि त्याही सलग एक वर्ष घेण्याचा उपक्रम शिवसंस्कार माध्यमातून घेण्यात आला. खरंतर मी म्हणेन की हा उपक्रम नसून एक ऐतिहासिक असा विक्रम आहे. यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेचा, तसेच असा वेगळा विचार करणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे निश्चितपणे कौतुक आहे.  छत्रपतींचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे किंबहुना तो नव्या रक्तात रुजणे ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रचंड खर्चिक असे आयोजित केलेल्या भव्य ऐतिहासिक महानाट्य आठवणींना उजाळा दिला. मात्र आपला उद्देश केवळ शिव विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हाच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. छत्रत्पतींचे शिवविचार घेऊन आम्ही सर्वजण युवा रोजगारासाठी काम करत आहोत, त्यात आपणा सर्वांचा सहयोग असू द्यावा असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी केले आहे. 

यावेळी मातृभूमी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वर्षभर घेण्यात आलेल्या  विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीषजी मोरे मातृभूमी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले, शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष श्री गणेश ठाकूर, मुख्य समिती सदस्य ॲड सोनू गवस, संदेश देसाई, सोनम ठाकूर, मनोज शेडगे, डॉ. संगीता चांदेकर, निलेश केरकर, उदय देसाई, मंदार गावडे, श्री नितीन नाईक, वृषाली शिंदे, अंकुश सुद्रिक, अभिजीत राऊळ,  कृष्णा करमळकर, गौरी सुद्रिक, उदय पास्ते, सौ. संध्या प्रसादी यांसह संस्थेचे पदाधिकारी उपास्थित होते.