
सावंतवाडी : अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने बुधवारी 19 फेब्रुवारीला सावंतवाडी येथील शिव उद्यान जवळ भव्य दिव्य शिवजयंती उत्सव सायं. ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रथमच भव्य दिव्य असा हा शिव जयंती उत्सव भरवण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे.
सायंकाळी सहा वाजता शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन त्यानंतर बिबवणे हायस्कूल कुडाळचा लेझीम कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात तीस वाजता समाजातील प्रतिष्ठीत मान्यवर व विद्यार्थी गुणवंतांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दहावी बारावी पदवी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान गौरव केला जाणार आहे. त्यानंतर रात्री आठ वाजता पोवाडा कार्यक्रम सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबुराव शंकर कांबळे आणि कोल्हापूर यांचा शिवकथेवर समर्पित पोवाडा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत व तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी केले आहे.