
सावंतवाडी : शिवजयंती निमित्त 18 तारीखला संध्याकाळी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला ते माडखोल पर्यंत शिवज्योत आणण्यात आली. तसेच शिवजयंती दिवशी श्री देवी पावणाई मंदिर ते व्ही पी कॉलेज माडखोल पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात खास आकर्षण सिंह गर्जना ढोल ताशा पथक कणकवली आणि विद्यार्थ्यांचे लेझीम पथक होते. शिवअभिषेक व शिवमुर्ती पूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रात पहिल्यांदाचा 55x20 फुटी शिवफलकाचे अनावरण करण्यात आले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख वक्ते अमित गोते पोलिस उपनिरीक्षक, सिंधुदुर्ग उपस्थित होते. त्यांनी शिवकालीन विचार आणि सध्याच्यी पिढी यांवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विचार मांडले
यावेळी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, अरूण पाटील, डॉ संदेश सोमनाचे सांस्कृतिक प्रमुख दिप्ती फडते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील शिवराज्य व्यवस्थापक कमिटीने केले होते.