शिरोडा उपजिल्हा रूग्णालयाला मिळणार बालरोग, स्त्री रोग तज्ञ व सर्जन डाॅक्टर | प्रितेश राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश

Edited by: दिपेश परब
Published on: August 07, 2023 17:12 PM
views 322  views

वेंगुर्ला : शिरोडा उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे बालरोगतज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ डाॅक्टर नसल्यामुळे शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थाची गैरसोय होत होती यासाठी त्यांना गोवा किंवा इतर शहराच्या ठिकाणी जाव लागत असे यात गरीब व गरजू ग्रामस्थाचे हाल होत असत हा सर्व विषय लक्षात घेऊन रेडी जि.प. माजी सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील यांना ब-याच वेळा हा विषय लक्षात आणून डाॅक्टरची मागणी केली होती.

त्या प्रमाणे त्यांनी ५ आँगस्ट रोजी या संदर्भात लेखी पत्र दिल होते व पूर्वी प्रमाणे पाठपुरावा सुरु ठेवला होता. या पाठपुराव्याला यश येऊन डाॅ.श्रीपाद पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधी मंडळशी चर्चा करुन बालरोग तज्ञ डाॅ.प्रवीण देसाई आठवडयाचे तीन दिवस, सर्जन डाॅ.वजराटकर आठवडयाचे तीन दिवस व स्त्री रोग तज्ञ डाॅक्टर आठवडयातून एक दिवस देण्याचे मान्य केले आहे. यामुळे शिरोडा पंचक्रोशी तील ग्रामस्थाच्या महत्वाच्या डाॅक्टर विषयी मागण्या पूर्ण झाल्या आहेत. अशी माहिती प्रितेश राऊळ यांनी दिली आहे. याबाबत भाजप शिरोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच राहुल गावडे, भाजप रेडी जि.प.विभाग प्रमुख अमित गावडे, रेडी ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला होता.