शिरगाव वसतिगृहाच्या इमारतीला आग | ७ लाखांचे नुकसान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 14, 2024 11:40 AM
views 310  views

देवगड : देवगड येथील शिरगाव हायस्कूल मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील ३ खोल्या आणि पडवीला शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

शनिवार दि. १३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता येथील शिरगाव हायस्कूल मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या ३ खोल्याना तसेच बाजूच्या पडवीला अचानक आग लागली. संकेत चव्हाण आणि संतोष चव्हाण या युवकांना आग लागल्याचे समजताच त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तेलीवाडीतील ग्रामस्थांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.  या आगीत ३ खोल्या आणि पडवी जळाली असून. किरकोळ धान्य कोठार जळाले. इमारतीचे छप्पर ही जळून खाक झाले. सकाळी संस्था पदाधिकाऱ्यांनी, प्राचार्य, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचे पाहणी केली. देवगड पोलीस ठाण्याला, समाजकल्याण विभागाला या बाबत लेखी कळविण्यात आलं.