शेर्ले पानोसेवाडी साकवाचे काम रद्द करा

सरपंच - ग्रामसेवकांची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: March 19, 2024 15:21 PM
views 252  views

सावंतवाडी : शेर्ले पानोसेवाडी साकव तयार करण्याचे काम मंजूर होण्यासाठी  समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावामध्ये उल्लेख केल्यानुसार साकवाचा लाभ अनुसुचित जातीच्या वस्तींना होणार म्हणून सुचित केले होते. त्यामुळे सदर साकवासाठी निधी हा अनुसुचित जातीच्या वस्तींचा वापरण्यात येणार होता. परंतु, अनुसूचित जातीचा निधी या साकवासाठी वापरण्यात येवू नये. या योजनेतून साकवाचे काम तात्काळ रद्द करण्यात यावे असे पत्र शेर्ले सरपंच श्रीम. प्रांजल प्रशांत जाधव व‌ ग्रामसेवक यांनी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देत काम रद्द करण्याची मागणी केली आहे.