
चिपळूण : सावर्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या साक्षीने आमदार शेखर निकम यांनी सावर्डेचे ग्रामदैवत श्री देव केदारनाथ यांचे दर्शन घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ केला. श्री देव केदारनाथ चरणी नतमस्तक होत, त्यांनी शुभ आशीर्वाद घेतला आणि जनतेच्या सेवेत पुन्हा एकदा समर्पित होण्याची प्रार्थना केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले,चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी , सावर्डेचे ग्रामदैवत श्री देव केदारनाथ कायम पाठीशी असते, याची प्रचिती निकम साहेबांपासून पाहिलेली आहे. आपण ही सावर्डे पंचक्रोशीतील जनता मोठ्या संख्येने पाठिशी असता कशाची चिंता वाटत नाही. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे, चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सौ.पूजा निकम, अनिरुद्ध निकम, केतन पवार, युगंधर राजेशिर्के, सरपंच- सौ.समिक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, शांताराम बागवे, डॉ. अमोल निकम, डॉ.कृष्णकांत पाटील, प्रदीप निकम, बाबू चव्हाण, यशवंतराव चव्हाण, संजय चव्हाण, शौकत माखजनकर, अजित कोकाटे,विष्णुपंत सावर्डेकर, अजय नलावडे तसेच सावर्डेतील खोत, गुरव, गावकर, मानकरी, प्रतिष्ठित व्यापारी,सर्व पदाधिकारी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.