
सावंतवाडी : सावंतवाडी येथील भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. परंतु, चैत्राली निलेश मेस्त्री (वय ३२) या महिलेनं आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मयत महिलेचे मूळ रत्नागिरी खेड येथील आहे. तपासादरम्यान हा घातपात असल्याच संबंधितांकडून स्पष्ट केल्याची माहिती देखील समोर येत आहे. सद्यस्थितीत हा मृतदेह तपासणीसाठी कोल्हापूर येथे आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांना विचारणा केली असता अद्याप तपास सुरू आहे. तपास पुर्ण झाल्यानंतर घटनेची माहिती देण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.