
चिपळूण : चिपळूण येथे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. चिपळूण येथील उबाठा चे विद्यमान शहर प्रमुख व माजी नगरसेवक शशिकांत मोदी, शक्ती कुमार चवन, ज्ञानेश्वर नलावडे, यांनी आज भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष राम शिंदे, शहर चिटणीस विनायक वरवडेकर, दीप देवळेकर, सतीश मोरे, अविनाश सावर्डेकर, संदिप भिसे, अनिल सावर्डेकर, जतिन घाटे, विवेक गोखले अभिजित , शेंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.