वैभववाडीत पैठणी विजेत्या ठरल्या शरीफा काझी

धनश्री पडवळ, नलीनी पांचाळ ठरल्या उपविजेत्या | कोकणसाद LIVE चं आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 20, 2023 18:34 PM
views 158  views

वैभववाडी : कोकणसाद Live व दै.कोकणसाद आयोजित विल्बर्ट प्राॅपर्टीज प्रायोजित व कॅमलीन सहप्रायोजित खेळ पैठणीच्या खेळात वैभववाडीत शरीफा काझी या विजेत्या ठरल्या.धनश्री पडवळ व नलीनी पांचाळ यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.विजेत्या व उपविजेत्यांना पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वैभववाडी शहरातील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळाच्या मंडपात  खेळ पैठणीचा रंगला होता.या खेळात तालुक्यातील विविध भागातील महीलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष शांताराम रावराणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.यानंतर पैठणीच्या खेळासाठी थरार रंगला.वयोवृद्ध महीलाही उत्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या.तीन फेरीमध्ये चालेल्या या खेळात काझी वहीनी विजेत्या ठरल्या.दोन व तीन नंबरसाठी दोन स्पर्धकांचे समसमान गुण झाल्यामुळे आणखी एक खेळ घेण्यात आल्या.त्यामध्ये सौ.पडवळ ह्या व्दितीय व सौ.पांचाळ या यांनी तृतीय क्रमांक पटकावला.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर कोकणसाद लाईव्हच्या संपादक देवयानी वरसकर, मार्केटिंग हेड समीर सावंत,आयटी हेड विद्येश धुरी,मंडळाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे, उपनगराध्यक्ष संजय सावंत,मनोज सावंत,माजी अध्यक्ष शांताराम रावराणे,बाळा माईणकर,बापू कदम,बाळा पारकर, गंगाधर केळकर,तेजस आंबेकर, नितीन महाडिक , अविनाश साळुंखे ,यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी भाषण करताना संपादक सौ.वरसकर म्हणाल्या,महीलांना रोज रोजच्या कामातून एक विरंगुळा मिळावा.तसेच यानिमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हात या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.वैभववाडीकरांनीही आम्हाला चांगली साथ दिली.यापुढेही असंच प्रेम आमच्यावर राहू दे.तसेच स्त्री शक्तीचा जागर असाच पुढे चालत राहू दे असं आवाहन वरसकर यांनी केले.त्याचबरोबर दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या नियोजनाच कौतुक त्यांनी केलं.

डॉ. राजेंद्र पाताडे म्हणाले, कोकणसाद LIVE नेहमी समाजपयोगी उपक्रम राबवित असते. यावर्षी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन स्री शक्तीचा वेध घेण्याच काम केले आहे.त्यांनी पुढील वर्षीही येथेच कार्यक्रम करावा अशी मागणी यानिमित्ताने केली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.तसेच हा कार्यक्रम थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी हेड विद्येश धुरी,कॅमेरामन प्रसाद कदम ,साहील बागवे, अनिकेत नार्वेकर यांनी काम केले.या कार्यक्रमाचे आभार वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे यांनी मानले