किल्ले रत्नदुर्गवरील भगवती देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव

Edited by: मनोज पवार
Published on: October 01, 2024 07:15 AM
views 186  views

रत्नागिरी : ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रंगरंगोटी, आकर्षक पताका लावल्या असून विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. येथील मंदिरात ३ ऑक्टोबरला सकाळी घटस्थापना व देवीची आरती होईल. ४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते १० या वेळेत संजीवन गुरूकुलचे विद्यार्थी भजनसेवा करतील. ५ ला सायंकाळी ७ ते ८ या वेळेत श्री दत्तमंदिर मंडळ तळेकरवाडी यांचे भजन, ६ ला सकाळी श्री सुक्त पाठ, कथ्थक नृत्य सादरीकरण, सकाळी ११ व संध्याकाळी ४ वा. जय भवानी महिला मंडळाचे भजन आणि सायं. ७ वा. श्री सांब सेवा मंडळ पेठकिल्ला यांचे भजन होईल. ७ व ८ ऑक्टोबरला नित्यपूजा, आरती आदी कार्यक्रम होतील. ९ ला भगवती स्पोर्ट्स राजवाडी आयोजित ढोलवादन स्पर्धा रात्री ८ ते १० या वेळेत होईल. १० ला दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ११ ला रात्री १२ वा. देवीचा गोंधळ व १२ ला दसऱ्याच्या दिवशी दुपारी १२ वा. घट विसर्जन व देवीची आरती असा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वा. सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल.