आमच्या पाठीशी 'शरद पवार' : पुंडलिक दळवी

Edited by: विनायक गांवस
Published on: October 20, 2024 12:51 PM
views 199  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार आहे. कामाला लागा असे आशीर्वाद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे निश्चितच अर्चना घारे-परब निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उतरणार अशी माहिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दळवी म्हणाले, आमचा शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. ते आमच्या पाठीशी आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून येथून अर्चना घारे-परब या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल. इतर चर्चाबाबत आज बोलणार नसून योग्यवेळी भुमिका स्पष्ट करू असंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला तालुका अध्यक्षा दिपाली राणे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.