
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली. अर्चना घारे-परब व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून सिंधुदुर्गतील पक्षसंघटनेबाबतची माहिती शरद पवार यांनी घेतली.
याप्रसंगी कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे-परब, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, उद्योजक संदीप घारे आदी उपस्थित होते.